* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
एका कावळ्याने एक मासाचा तुकडा चोरला होता. तो चोचीत धरून तो एका झाडावर बसला होता, तोच तेथे एक कोल्हा आला. ते कावळ्याच्या तोंडातले खाद्य दिसताच आपण ते बळकवायचे, असे कोल्होबा च्या मनात आले.
त्या झाडाखाली उभे राहून त्याने त्या कावळ्याची तोंडभर स्तुती आरंभली. तो त्याला म्हणाला, “अहाहा ! किती सुंदर नि मोठा पक्षी आहेस रे तू ! खरं म्हणजे सर्व पक्षांचा तू राजाच शोभला असतास! सर्वांनी तुला राजा म्हणून निवडलही असते रे; पण, एकच उणीव आहे तुझ्यात. तुझा आवाज तितकाच सुंदर हवा होता."त्या आपल्या स्तुतीने कावला खुलला होता. त्याला जरा शेफारल्यासारखे वाटले, आपला आवाज ही सुंदर आहे असे त्या स्तुतिपाठकला पटवण्याचे त्याने ठरविले. नि तो एकदम आपल्या कर्कश आवाजात गाऊ लागला.
त्याचे गाणे कसे असेल हे काय सांगायला पाहिजे ? पण त्या गडबडीत खटपटीत त्याच्या तोंडातला तो मासांचा तुकडा मात्र पटकन खाली पडला.
वर पाहून त्या कावळ्याला तो म्हणाला, “ खरं म्हणजे मित्रा तुझ्याकडे जे काही इतर गुण आहेत त्याचं एकाचीच जास्त उणीव आहे, ती म्हणजे अकलेची. तुला कधी अक्कल आली तर मात्र आदर्श राजा होशील.”
तात्पर्य - अकलेशिवाय बाकी गोष्टी व्यर्थ होत ! कोणी कधी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये.
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
आणखी छान गोष्टी वाचा -
2. मुंगी आणि नाकतोडा ची गोष्ट.
3. Blogger blog post me image kaise add kare ?

Smartbtechnic