एकदा एक मुंगी नदीच्या किनाऱ्यावर फिरत असताना नदीत पडली आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत दूर जावू लागली. तिच्या जीवावर आलेले ते संकट पाहून झाडावरील एका कबुतराने जवळचे एक पान तोडले व त्या मुंगी समोर पाण्यात टाकले.
आधार सापडताच ती मुंगी कबुतराने टाकलेल्या त्या पानावर चढली व त्या पानाच्या साहाय्याने सुरक्षितपणे नदीच्या बाहेर आली.
काही दिवसांनी एक शिकारी पक्षांना पकडण्याची साधने घेऊन नदीच्या तीरावर आला, त्याने झाडावर बसलेल्या त्या कबूतरला पाहिले व त्या कबुतराला मारण्यासाठी बंदुकीने नेम धरला.
हे मुंगीने पाहताच, ती मुंगी त्या शिकारीच्या पायाला कडकडून चावली. मुंगी चावताच त्याच्या पायाला एकदम दुखापत झाली आणि त्याच्या बंदुकीचा नेम चुकला. त्यामुळेच सावध होऊन कबूतरही तेथून भुररकन उडून गेले.
तात्पर्य -
उपकाराने उपकार नेहमी वाढतच जातात. सत्कृत्य सहजवृत्तीने नेहमी करीत राहावे. सहज सत्कृत्य करण्याची वृत्ती ही सर्वश्रेष्ठ सद्गुण होय.
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
Read More :
1. मुंगी आणि नाकतोडा ची गोष्ट.
3. Daily use English words with Hindi meaning.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
Smartbtechnic