एक सिंह म्हातारा व अशक्त झाला होता त्याला कोणाशी झगडून किंवा स्वतःच्या हिमतीवर शिकार करून आपल्या पोटाची सोय करणे अगदीच अशक्य झाले होते तेव्हा आपल्या अक्कलहुशीवरच सारी भिस्त टाकण्याचे त्याने ठरविले.
अखेर एके दिवशी एक कोल्हा त्याला भेटावयास आला. त्याने तत्काल त्या सिंहाची शक्कल ओळखली आणि म्हणूनच तो अगदी दूर अंतरावर उभा राहिला, नी त्याने विचारले, “काय महाराज ? कशी काय आहे तब्येत खाविंदांची ?”
गुहेतील आपल्या बसल्या जागेवरूनच; एक सुस्कारा टाकीत सिंह म्हणाला, “फार फार बिघडली आहे बाबा ! पण असं काय? ये, आत ये ना, लांबून काय विचारतो आहेस? बस जरा इथं.”
कोल्हा तेथूनच म्हणाला, “मोठ्या आनंदाने आलो असतो हो राजेसाहेब !” पण मला इथं सारी आत शिरणारी पावलं दिसताहेत ! आतून बाहेर येणाऱ्या कोणाच्याच पावलाचे ठसे कुठेच दिसत नाहीत हे कसे ?
तात्पर्य -
शहाणी व धोरणी माणसे नेहमी भावी धोक्याची आधीच जाणीव ठेवतात व त्याच प्रमाणे सावधगिरीने वागून पुढल्या धोक्यात-संकटात ती कधीच सापडत नाहीत नेहमी धोरणी पावले टाकतात.
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
आणखी छान गोष्टी वाचा -
3. Blogger blog post me image kaise add kare ?
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
Smartbtechnic